स्व नितीन महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ‘मोठ्या उत्साहात संपन्न;

स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी
प्रतिनिधी : दिनांक 15 रोजी स्व .नितीन महाविद्यालय, पाथरी. राष्ट्रीय सेवा योजना विभाग,ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
ग्रंथालयामध्ये ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावरील व महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी भरण्यात आले या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध वक्ते प्रा एस आर यादव सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य राम funne व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या ग्रंथा प्रदर्शना साठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट दिली व ग्रंथाचे वाचन केले.
भारतरत्न ए.पी.जे .अब्दुल कलाम व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषावर व्यक्ती आणि कार्य या विषयावर प्राध्यापक एस. आर .यादव सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा परिचय व जीवनकार्य व त्यांचा खडतर प्रवास सांगितला. समाजामध्ये अजूनही अज्ञात जातीयता ,गरिबी, दारिद्र्य व अंधश्रद्धा अंधार दाटून आलेला आहे. महात्मा फुले यांचा सत्यधर्म व समतेची दिव्यदृष्टी घेऊ युवकांनी वैचारिक साहित्याच वाचन व चिंतन केले पाहिजे. यावेळी विचार मंचावर प्राचार्य डॉ एस आर फुने व उपप्राचार्य डॉ. साहेब राठोड, मराठी विभाग प्रमुख मोरे जी. जे .उपस्थित होते. प्राध्यापक व शिक्षक तर कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रंथपाल कल्याण यादव, महेश तौर, यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल