चितळकर परिवाराकडून विविध ग्रंथाचा पारायण सांगता व गुरूवर्य सद्गुरू नराशाम महाराज पाध्यपुजा किर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती वडजे

नांदेड शहरातील असर्जन येथील वरदनगरी येथे चितळकर परिवारातर्फे सहा ग्रंथाचे पारायण सांगता व गुरूवर्य सद्गुरू नराशाम महाराज पाध्यपुजा किर्तन सोहळात
श्री श्री सद्गुरु नराशाम महाराज, ह.भ. प.राम महाराज पांगरेकर, नांदेड दक्षिणचे आमदार श्री आनंदरावजी बोंढारकर साहेब व नांदेड जि. म. स.बँकेचे संचालक श्री गोविंदराव पा. शिंदे नागेलीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहा ग्रंथाची सांगता सोहळा मोठ्या उत्साहामध्ये असर्जन येथील वरदनगरी ता. जि.नांदेड येथे मोठ्या भक्ती भावाने पार पडला. आम्ही वारकरी परिवारांच्या सर्व सदस्यांच्या मातृतुल्य सौ.गंगाताई विलासराव चितळकर यांनी गेल्या वर्षभरामध्ये एकूण सहा ग्रंथाचे पारायण केलेले आहे त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा, संत नामदेव महाराज गाथा, अमृतानुभव, संत एकनाथ महाराज गाथा, एकनाथी भागवत. अशा सहा ग्रंथाचे पारायण केलेले आहे आणि त्या पारायणाची सांगता आज दिनांक ०५-११- २०२५ रोजी बुधवारी वरद नगरी असर्जन येथील गुरुकृपा या त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज पांगरेकर यांचे *भाग्यवंता घरी भजन पूजन!त्याची वाट पाहे रघुनंदन!जगाच्या बाजारी सर्व काही मिळे!परी दुर्लभ संतजन.* या अभंगावर अतिशय उत्कृष्ट व मंत्रमुग्ध करणारे असे हरिकीर्तन झाले, त्यानंतर गुरुवर्य श्री श्री सद्गुरु नराशाम महाराज यांचे आशीर्वाचनपर मनोगत झाले. त्या मनोगतातून महाराजांनी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या धर्मशाळेच्या बांधकामासाठी मदत करण्याचे जाहीर आव्हान केले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व भाविक भक्त उपस्थित होते. तसेच आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी,माताभगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन चितळकर परिवाराने केलेले होते. हरी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
या सांगता सोहळ्यामध्ये आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून पंढरपूर येथील धर्मशाळेचे बांधकाम सुरू असल्याबाबत महाराजांनी सांगितले असता इंजिनीयर श्री सतीश विलासराव चितळकर यांनी एक रूम बांधकाम खर्च देण्याचे सांगितले. याच बरोबर बांधकामासाठी अजीवन सभासत्व घेणारे सन्माननीय नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर साहेब यांनी एक लाख एक हजार रुपयांचा चेक संस्थेकडे सुपूर्द केला. तसेच दुसरे अजीवन सभासत्व घेणारे छत्रपती संभाजीनगर येथून आलेले व्यंकटेश गोत्रम साहेब यांनी सुद्धा 50 हजार रुपयाचा चेक संस्थेकडे सुपूर्द केला आणि तिसरे अजीवन सभासदत्व स्वीकारणारे श्री जगन्नाथ चक्रवार सावकार यांनी या कार्यक्रमाच्या अगोदरच एक लाख रुपयाचा चेक संस्थेकडे सुपूर्द केलेला आहे तीनही दात्यांचे संस्थेच्या वतीने मनापासून धन्यवाद.
तसेच पंढरपूर येथे बांधण्यात येणाऱ्या धर्मशाळेसाठी महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की,यथाशक्ती आपल्या प्रपंचातून जे शक्य असेल ती आर्थिक मदत संस्थेला धर्मशाळा बांधकामासाठी करावी. या धर्मशाळेसाठी एक कोटी सात लाख रुपये खर्च लागत आहे. त्यामध्ये आपला स्वतःचा काही खारीचा वाटा असावा अशी आपणास संस्थेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला सर्व मान्यवरांचा,भजनी मंडळाचा व किर्तनकार, संस्थेतील पदाधिकारी,यांचा सर्वांचा यथोचित सन्मान चितळकर परिवारातर्फे करण्यात आला.
या धार्मिक कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते.
श्री श्री सद्गुरु नराशाम महाराज,
हभप राम महाराज पांगरेकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, संस्थेचे सचिव ह.भ.प.व्यंकटराव महाराज जाधव माळकौठेकर , जगन्नाथ चक्रवार सावकार जिल्हा उपाध्यक्ष, व्यंकटेश गोत्रम उद्योजक चंपतराव पाटील डाकोरे राज्य प्रसिद्धीप्रमुख शिवाजी पांगरेकर सल्लागार, बालाजी शिंदे जिल्हा सचिव, शिवाजी मदमवाड कोषाध्यक्ष, बालाजी पारडीकर मुदखेड सचिव, नंदू वैद्य कार्याध्यक्ष, संतोष कदम सदस्य, ज्ञानेश्वर काकांडीकर कीर्तनकार अध्यक्ष, मारोती वडजे मुखेड तालुकाध्यक्ष
अनिताताई पतंगे महिला आघाडी अध्यक्ष, सौ कुसुमताई शिंदे सदस्य,प्रिया पांगरेकर, द्रोपदा राजे, सौ.जयश्रीताई जाधव,भाग्यश्रीताई कदम शेकडो सदभक्त मंडळी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल