स्वराज्य वार्ता / बबनराव वि. आराख
गांगलगाव : चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील बहुर्चचित रोडचे काम गेली अनेक वर्षापासून विविध कारणास्तव रखडले होते.
सविस्तर वृत्त असे की, गांगलगाव येथील दलित वस्ती मधील अबाशी व खैरव या गावाना जोडणारा रस्ता गेली कित्येक वर्षापासून खितपत पडला होता. विषेश म्हणजे सदर रस्त्याचे अनेक वेळा अर्धवट काम होउन स्थगित झाले होते.
मात्र यावेळेस, युवा संरपच शेषराव आराख यांच्या निर्रभिड प्रयत्नाने सदर रोडचे काम अर्धे पु्र्ण झाले असून, उर्वरित रोडचे काम लवकरच सुरु होईल असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या बहुचर्चित रोडचे अर्धे काम पु्र्ण झाले असून, पुढील उर्वरित रोडचे काम लवकरच सुरु व्हावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
सरपंच शेषराव आराख हे गांगलगाव ग्रामपंचायतचे गेल्या दीड वर्षापासून सरपंच पदि रूजू झाले असून ते उत्तम प्रकारे पदभार सांभाळत आहे.त्यांच्या कार्यक्रीदीत सध्या या रोड बरोबर गावातील अनेक ठिकाणी रोडचे काम पुर्ण झाले आहेत, तर काही रोडचे काम प्रगती पथावर सुरु आहे.
सदर रोडचे काम गेल्या कित्येक वर्षापासून अनेक कारणाने रखडले होते, मात्र यावर्षी संरपच शेषराव आराख यांच्या प्रयत्नातून या रोडचे काम पुर्ण होत असल्यामुळे, सरपंच शेषराव आराख तसेच ग्रामपंचायत यांचे गावकरी यांच्याकडून आभार व्यक्त होत आहेत.

सरपंच शेषराव आराख –
( गांगलगाव ग्रामपंचायत )
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






