पीएमश्री जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा मानवतच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरावर भरारी; अबूजर पठाणचे जलतरण स्पर्धेत घवघवीत यश;

स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी 

मानवत : पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवतचा विद्यार्थी अबूजर असेफ खान पठाण याने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मानवत येथील हत्तलवाडी रोडवरील जलतरण तलावामध्ये जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मध्ये पीएमश्री जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या अबूजर असेफ खान पठाण याने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर १०० मीटर बटरफ्लाय या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम आणि ४०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत तिहेरी यश संपादन केले. या दैदिप्यमान यशामुळे त्याची आता विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. माणिक घाटूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने विद्यार्थी अबूजर, त्याचे पालक श्री. असेफ खान पठाण, क्रीडा शिक्षक श्री. गुलाब लाड सर आणि वर्गशिक्षिका श्रीमती सुनिता जोशी मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल