सोयंजना–शेरोडा येथे शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन पीक कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करण्याची मागण
परतूर प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील सोयंजना येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची पूजा करून सण साजरा करण्याऐवजी यंदाच्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. सोयंजना–शेरोडा परिसरातील शेतकरी बांधवांनी एकत्र येत सोयंजना–शेरोडा–हातडी रोडवर बैलांसह आंदोलन केले. यावेळी बैलाच्या पाठीवर ‘कोरडा दुष्काळ तात्काळ जाहीर करा’ असा संदेश चित्ररूपाने साकारून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
परतूर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाने मोठा खंड दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तातडीने ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांनी परतूर तालुका सरसकट कोरड्या दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी केली. तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये, तर बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली असली तरी अनेक पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पीक कर्जमाफीची दुसरी यादी तात्काळ जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, अशीही मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसताना खरीप हंगामातील नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा भार यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
पोळा हा शेतकरी आणि बैलांच्या नात्याचा महत्त्वाचा सण आहे. याच दिवशी बैलाच्या पाठीवर ‘कोरडा दुष्काळ तात्काळ जाहीर करा’ असा संदेश लिहून शेतकऱ्यांनी शासनाला आपल्या व्यथा वेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा.
सत्तेमध्ये असलेले आणि विरोधक हे दोन्हीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ब्र काढायला तयार नाहीत.
शेतकरी आज आर्थिक संकटात असताना सुद्धा या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून शेतकऱ्याचा मुद्दा बाजूला ठेवल्या जात आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव राज्य सरकार देत नाही एकीकडे राज्यसरकारने तुटपुंजी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. सोयाबीन तूर कापूस उडीद मूग यासारखी पिके उध्वस्त झाली आहेत शेतकऱ्यांच्या हाता तोंडशी आलेला घास वरून राजाने गिळंकृत केला आहे.यामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
आणि आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी बांधवांनी दिला.
.सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मंडळ अधिकारी परतुर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनावरील सह्या
बालासाहेब कराळे,बाबासाहेब ढवळे,दिगंबर नळगे,शंकर नळगे,माऊली भाऊ सोळंकै,मुरलीधर बळीराम ढवळे,मुरलीधर बळीराम ढवळे,उद्धव दौलतराव कराळे,विकासराव नळगे,हरी सोळंके,वैजनाथ देविदास ढवळे,बाळासाहेब कराळे,रवी कराळे,नंदकिशोर बोराडे.यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






