मंठा तालुका दुष्काळसदृश यादीत घ्या, अन्यथा आंदोलन – किसन पाटील;

मंठा : मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील १८१ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेमध्ये जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय अन्यायकारक असून, पावसाचा खंड, पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट लक्षात घेता मंठा तालुक्याचाही दुष्काळसदृश परिस्थितीतील तालुक्यांमध्ये समावेश करणे आवश्यक आहे, अशी मागणी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांनी केली आहे.

मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली; मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागांतील पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने मंठा तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत मंठ्याचा समावेश करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही दुष्काळी सवलती व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन मंठा तालुक्याचा समावेश करावा. मंठा तालुक्याचा दुष्काळसदृश यादीत समावेश करून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर जागर प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा किसन पाटील चव्हाण यांनी दिला आहे.

“मंठा तालुक्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही. मंठ्याचा दुष्काळसदृश यादीत समावेश करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” अशी ठाम भूमिका किसन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल