स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या निवासी शिक्षकांची माहिती देण्यास केंद्रप्रमुख राम सोळंके टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप उपोषण करते राहुल आवटे यांनी केला आहे.राहुल आवटे यांच्या म्हणण्यानुसार, आष्टी केंद्रातील अनेक शाळांमध्ये शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. शाळा सुटल्यानंतर शिक्षक शहरात निघून जातात, त्यामुळे सकाळी उशिरा येणे, संध्याकाळी लवकर जाणे आणि ऐनवेळी सुट्टीवर राहणे असे प्रकार घडत आहेत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.याबाबत माहिती विचारण्यासाठी गेल्यास केंद्रप्रमुख सोळंके हे उडवाउडवीची उत्तरे देतात, माहिती देण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. यामागे आर्थिक हव्यास असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे.आम्ही वारंवार निवासी शिक्षकांची यादी, हजेरी आणि वास्तव्याबाबत माहिती मागितली, पण केंद्रप्रमुखांकडून ती दिली जात नाही. हा प्रकार म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे,” असे राहुल आवटे यांनी सांगितले.या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी, जालना जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी लक्ष घालून आष्टी केंद्रातील सर्व शाळांची प्रत्यक्ष पाहणी करावी, निवासी-अनिवासी शिक्षकांची यादी जाहीर करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जागर प्रतिष्ठान जालना जिल्हाध्यक्ष राहुल आवटे यांनी केली आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






