स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
गंगाखेड येथे गटक्षिक्षण अधिकारी कार्यालय येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत जेष्ठ सामाजिक चळवळींचे नेते सोपानराव नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत खालिल मुद्यावर चर्चा केली असता अनेक गावांत दिव्यांगाना पाच टक्के निधी, घरकुल, अंत्योदय राषण मिळत नसल्यामुळे सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे लेखी ऊतर मागितले असता ते सोडविता आले नसल्यामुळे उपमुख्य कार्यकारी पंचायत विभाग जि.प. परभणी यांना फोनवर संपर्क केले असता त्यांनी आज बैठकीत आढावा घेतो मला गावाचे नाव पाठविण्यास सांगितले असता निवेदन व गावाचे नावे पाठविण्यात आले व निवेदनाची चार दिवसांत ऊतर देण्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी गंगाखेड यांनी अश्वारूढ दिले.
आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायत व आपली. पंचायत समिती मार्फत दिव्यांगाचा साठी राखिव असलेला पाच टक्के निधी इ.२०१८ ते आजपर्यंत वाटप केलेला आहे व खालिल मुद्द्याचे लेखि ऊतर द्यावे
१) आपल्या पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायत ने दिव्यांगासाठी राखिले असलेला पाच टक्के निधी इ.स.२०१८ ते आजपर्यंत वाटप केलेल्या लाभार्थी यादिसहीत माहिती द्यावी.व वाटप केलेला नसेल तर कारणासहित माहिती द्यावी
२) आपल्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतने दिव्यांगाचा कायदा दिव्यांगाना माहिती व्हावी म्हणून दिव्यांगासाठी किती ग्रामसभा घेण्यात आली त्यांची माहिती द्यावी
३) किती ग्रामपंचायतमध्ये ने दिव्यांचा साठी अंत्योदय रास्त कार्ड साठी ठराव दिला,किती दिव्यांगाना घरकुल योजनेचे घरकुल दिले त्यांची माहिती द्यावी
४) किती ग्रामपंचायतने दिव्यांगाची ग्रामपंचायत ने रजिस्टरमध्ये नांव नोंदणी केली व आपल्या तालुक्यात किती दिव्यांगाची नोद झाली त्याची माहिती रजिस्टर प्रतसहित माहिती देण्यात यावी.
आपल्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी २०० स्कु.फुट जागा किंव्हा गाळे दिले त्यांची माहिती द्यावी.
वरील पाच. मुद्दे दिव्यांगाना दिव्यांग कायदा व शासन निर्णयानुसार आपण किती वेळा लेखि आदेश दिले त्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व दिव्यांचा हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी यांच्या वर आपण काय कार्यवाही केली त्यांची प्रत देण्यात यावी
अशी मागणी करण्यात आली या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,जेष्ठ नेते सोपानराव नागरगोजे,शेख मौलासाब
,सय्यद सादिकसाब, गोपीनाथ केंद्रे, सुभाष भिमनपल्लेवाड, जगन्नाथ फुले, बाबुराव शेवाळे,विठ्ठल मुसळे सुखकर गाढे इत्यादी असे प्रसिध्दी पत्रक दिले
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







