आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी, येथे आज आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत आष्टी बीट परिसरातील विविध केंद्रांतील शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत समर्थ बाळकृष्ण अंकुशकर (इयत्ता ७ वी) आणि वेदांत शंकर गंगथरे (इयत्ता ५ वी) या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने परीक्षकांची मने जिंकत बीट स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही विद्यार्थ्यांची आगामी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर गंगथरे सर आणि शाळेचे प्राचार्य श्री. कास्तोडे सर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली.
व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






