जिल्हा परिषद प्राशाला आष्टीची पाहणी ; उशिरा येणाऱ्या शिक्षकाला नोटीस

स्वराज्य वार्ता/उमेश वैद्य 

आष्टी | परतूर तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा परिषद प्राशाला, आष्टी येथे जागर प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष राहुल आवटे यांनी पाहणी दौरा केला असता, शाळेतील एक शिक्षक शाळेच्या निर्धारित वेळेत गैरहजर असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दि. २२/०८/२०२६, वार शनिवार रोजी सकाळी ०८:३० वाजता शाळेत शिक्षकांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना, श्री. पीराणे सर हे उशिरा आल्याचे निदर्शनास आले. शाळेच्या वेळेत ०९.१२ पर्यंत ते उपस्थित नव्हते व शाळेचे प्रस्तावित कामकाजही वेळेत पूर्ण केलेले नव्हते. यावेळी पाहणी दरम्यान पत्रकार उमेश वैद्य हे देखील उपस्थित होते.या संदर्भात जागर प्रतिष्ठान, जालना जिल्हाध्यक्ष राहुल आवटे यांच्या वतीने केंद्रप्रमुखाकांमार्फत संबंधित शिक्षकाला पत्र देण्यात आले आहे. यावेळी मुख्याध्याप आर आर कुलकर्णी हे ही उपस्थित होते. सविनय विनंती करण्यात येते की, आपण निर्धारित वेळेत शाळेत उपस्थित राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी याबाबत खुलासा सादर करावा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. या कारवाईमुळे आष्टी परिसरातील शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी वेळेचे पालन करावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल