स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
आष्टी : परतूर तालुक्यातील कनकवाडी : Vision Valley Public School येथे आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर गंगथरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. मोहन सोळंके सर, डॉ. सरकटे, डॉ.बरसाले , डॉ.राठोड, ॲड. वसीम, जमीनदार, डॉ. सोळंके डॉ. पताळे, बाबुभाई टाकळीकर, प्रफुल्ल शिंदे, अशोक शेळके, उपसरपंच सुनील गुंजकर,मधुकर कोल्हे,श्री. राजू दादा सोळंके, भागवत जगताप, मधुकर कोळे, पोलीस कर्मचारी श्री. पांढरेसर व वाघमारेसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्यकला व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, मोहन सोळंके सरांचा सेवा गौरव डॉ. शंकर गंगथरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळावी यासाठी व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आलेला हा उपक्रम विशेष ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राम सर यांनी केले. आयोजनासाठी संस्थेच्या सचिव सौ. सुजाता गंगथरे मॅडम तसेच शाळेचे प्राचार्य श्री. कास्तोडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राठोड सर, श्री. घाटूळ सर, श्री. दत्ता सर, श्री. परमेश्वर सर, श्री. गायकवाड सर, श्री. साजिद सर, श्री. अजय सर, कुरधने मॅडम, गिराम मॅडम, निंबाळकर मॅडम, सानिका मॅडम, वैष्णवी मॅडम, गांजळे मॅडम व शिंदे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे नियोजन आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर गंगथरे यांच्या मार्गदर्शनामुळे Vision Valley Public School मधील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






