वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप;

वाढदिवसाची उधळपट्टी टाळून सामाजिक बांधिलकी; पत्रकार उमेश आसाराम वैद्य यांनी चिमुकल्यांसोबत साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस

आष्टी : येत वाढदिवसाच्या नावाखाली होणारी उधळपट्टी टाळून तोच पैसा सामाजिक कार्यासाठी वापरावा, या हेतूने दैनिक तुफान क्रांतीचे परतूर प्रतिनिधी पत्रकार उमेश आसाराम वैद्य यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांनी आपले चिरंजीव लव उमेश वैद्य याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. १३) जाम समर्थ ता. घनसावंगी येथील ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.आश्रमातील ४५ गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज आनंदे, वंचित बहुजन आघाडीचे आष्टी शहराध्यक्ष गणेश वैद्य, स्वराज्य युवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक अध्यक्ष राहुल आवटे, आसाराम वैद्य, परमेश्वर मस्के, गौरव श्रीसागर, गजानन गते, दीपक झुंजे, राम घाटूळ, मयूर भंडारे, नवनाथ वैद्य तौफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. थथे

“वाढदिवसावर फटाके आणि मोठ्या पार्टीपेक्षा जर एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदत झाली तर त्यातच खरा आनंद आहे. लवच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त हा छोटासा प्रयत्न केला,” असे यावेळी उमेश आसाराम वैद्य यांनी सांगितले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल