आष्टी पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांवर गुन्हा, २.४० लाखांचा मुद्देमाल जप्त;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर : परतूर तालुक्यातील लोणी शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर आष्टी पोलिसांनी धाड टाकून १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोटारसायकल असा एकूण ₹२,४०,६५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २३/०७/२०२६ रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलीस कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्तफत मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस स्टेशन आष्टी हद्दीत असलम शेख रा. आष्टी यांचे मोजे लोणी ता. परतूर शिवारातील पडीत शेतातील लिबाच्या झाडाखाली काही लोक गोलाकार बसुन झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळताना मिळुन आले व पोलीसांना पाहुन पळू लागले, त्यापैकी दोघांना पोलीसांनी पकडुन पळुन गेलेल्या आरोपंची नावे व पत्ता घेंतला, मिळुन आलेल्या आरोपीच्या ताब्यात रोख रक्कम ६५० रुपयें, जुगार पत्ते व मोटार सायकल असा एकुण २.४०.६५० रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्ह्याचे तपासकामी जप्त केला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल राणा पांढरे यांचे फिरियादीवरुन आरोपी १) कैलास विक्रमराव भिगारे २) बालू यशवंत चव्हाण दोन्ही रा. लोणी ता. परतुर जि. जालना, २) संजय राजाराम आढे ४) राहल कृष्णा राठोड क्र. ३ व ०४ रा., कणकवाडी ता, परतूर, 4) विकास बळीराम टेकाळे रा. गंगासावंगी ता. परतुर जि. जालना ६) इनायतुल्लाह शफिउल्लाहखान काकड ७) सुशिल रंगनाथ घुगे, ८) इम्रान फेरोज पठाण क्रमांक ०६, 0७, 0८ रा. आष्टी ता. परतुर, ९) कृष्णा जाधव रा. हस्तुर ता. परतुर, १०) राजु आंबादास चव्हाण रा. ढोकमाळ तांडा ता. परतुर यांचे विरुद्ध पो.स्टे. आष्टी गुर.नं. १७०/२०२६ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यप्रमाणे गन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री., तेघबीरसिह संध साहेब. मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री, विक्रम साळी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, रेंगे साहेब. यांच्या मार्गंदर्शनाखाली सपोन, श्र., गणेश सुरवसे, पोउपन. अजित चाटे, पोलीस स्टाफचे पोलीस अंमलदार शाम गायके राणा पांढरे. बन्सी पानजंजाळ. डिगांबर बादाडे. भरत ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.

आष्टीत गुटखा सुरू कारवाईची मागणी तुकाराम मुंढेच्या कार्याला आष्टीत खिंडार;

आष्टीत राजनिवास गोवा गुटखा सर्रास विक्री होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाचे तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीला आष्टीत खिंडार पडल्याचे दिसत आहे. परतूर अन्न व औषध प्रशासन गाढ निद्रेत दिसून येत आहे. तर स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील सुस्तच दिसून येत आहे. या मध्ये आष्टी पोलिसांकडून कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल