व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूल, कनकवाडी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी;

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे आज व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूल, कनकवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण शाळा विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिरसाने भारावून गेली.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीच्या पूजनाने झाली. या पूजनाचा मान वारकरी म्हणून लाभलेले श्री. निवृत्ती अण्णा तौर, श्री. गणेशरावजी बाण, श्री. संदिपान दादा टेकाळे, श्री. अण्णासाहेब तौर, श्री. बाबुराव कावळे, श्री. मधुकर कोल्हे पाटील,श्री. भागवत जगताप तसेच विद्यार्थी पालक समितीचे प्रमुख श्री. अरुण भाऊ डोईजडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी दिंडी काढत उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. शंकर गंगथरे सर व संस्थेच्या सचिव मा. सौ. सुजाता गंगथरे मॅडम यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महाआरती करण्यात आली.

हा संपूर्ण कार्यक्रम शाळेचे प्राचार्य श्री. *कास्तोडे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. *घाटूळ सर* यांनी केले.

तसेच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव *सुजाता गंगथरे मॅडम, श्री. राठोड सर, श्री. राम सर, श्री. दत्ता सर, श्री. परमेश्वर सर, श्री. गायकवाड सर, श्री. साजिद सर, श्री. अजय सर, कुरधने मॅडम, गिराम मॅडम, निंबाळकर मॅडम, सानिका मॅडम, वैष्णवी मॅडम, गांजळे मॅडम व शिंदे मॅडम* यांनी विशेष परिश्रम घेतले.

पालक, वारकरी, विद्यार्थी व शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा भक्तिमय सोहळा अत्यंत आनंददायी, शिस्तबद्ध आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल