शेख हबीब यांची आष्टी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण;

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी आणि व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले हबीब शेख यांची काँग्रेस पक्षाच्या आष्टी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जालना येथे आयोजित एका कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कल्याण काळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. याप्रसंगी लोकसभा खासदार कल्याण काळे, राजेंद्र देशमुख, राजेंद्र राख, परतूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब आकात, फिरोज बागवान आणि जिल्हा परिषद सदस्यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हबीब शेख यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, आष्टीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात पक्ष अधिक बळकट होईल आणि पक्षीय उपक्रमांना नवी गती मिळेल.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल