स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
आष्टी : परतुर तालुक्यातील आष्टी शहरांमध्ये पावसामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर आलेले गटार साचले होते त्यामुळे व्यापाऱ्यांकडे जाणाऱ्या ग्राहकांची तारांमुळे त्यामुळे काही ग्राहक आष्टीतील जुनी बाजारपेठ बाजार रोड महावीर चौक आझाद चौक शिवाजी महाराज चौक या रस्त्याला असलेल्या दुकानाकडे कानाडोळा करत असेल त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठ्या आर्थिक नुकसान होत होते तसेच कॉम्प्लेक्स मधील धर्मवीर संभाजीराजे चौकापासून कॉम्प्लेक्स मध्ये जाणारा रस्ता तिथे असलेल्या डीपी कस अशी मोठा कचऱ्याचा ढिगारा साचलेला होता व तेथे लोक लघु शंका करत होते.

त्यामुळे व्यापाऱ्याला मोठा त्रास होता वेळेत ग्रामपंचायतला व्यापाऱ्यांनी निवेदन दिल्याने ग्रामपंचायतीतील कर्मचारी तथा सरपंच उपसरपंच व तसेच सर्व सदस्य यांनी तात्काळ दखल घेत स्वच्छतेचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. आणि लवकरच रस्ते नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू अशा आश्वासन दिले. हताश झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये प्रसन्नता पसरली व त्यांच्या दुकान वर जाण्यास ग्राहकांसाठी रस्ते दुरुस्त झाले त्याबद्दल व्यापाऱ्यांमधून आष्टी ग्रामपंचायतीचे आभार मानले जात आहेत.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






