आदर्श कॉलनीत भर रात्री चोरी, ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास;

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

एकाच रात्री अनेक घरांवर चोरीचे प्रयत्न झाल्याने आष्टीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

आष्टी प्रतिनिधी : आष्टी येथील आदर्श नगर परिसरात शुक्रवारी ( दि. २७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका घरातन रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले. याचवेळी परिसरातील अनेक घरांचे कडी-कोंडेतोडन चोरीचे प्रयत करण्यात आले. एका घरातील नागरिकाच्या गळ्यावर चाक ठंवून धमकावण्यात आले, तर त्याच्या ‘मुलावर दगडफक करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोहम्मद मनार मोहम्मद खलील शेख यांनी २६ जून रोजी कौटुबक कार्यक्रमानिमित्त घराला कुलूप लावून मूलगा मोहम्मद रहीम याच्या घरी मुक्काम केला होता. शनिवारी ( दि. २७) सकाळी साडेसहा वाजता ते पत्नी व मलीसह घरी परतले असता घराच्या लोखंडी दरवाज्याच कडी-कोंडा व कुलूप तुटलेले आढळले. घरात पाहरणी केली असता रोख ४५ ह्जार रुपये आणि चांदीचे पैंजण असा एकण ५९ हजार रुपयांचा मृद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर परिसरात चौकशी केली.

असता चोरट्यांनी इतर अनेक घरांनाही लक्ष्य केल्याचे समोर आले. सरेश मंजाजी काळे यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती मिळाली तर महादेव नागनाथप्पा शेटे यांच्या घरात चोर शिरले असताना त्यांची पत्नी जागी झाली. यावेळी चोरट्यांनी महादेव शेटे यांच्या गळयावर चाक ठवून धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याला दूर लोटून घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मुलाच्या दिशेने दगड फेकत तेथून पळ काढला. याशिवाय आनंता दादाराव बोरकर यांच्या घराचाही कडी-कोंडा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोहम्मद मुनीर मोहम्मद खलाल शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, एकाच रात्री अनेक घरांवर चोरीचे प्रयत्न झाल्याने आष्टीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल