स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
माजलगाव : माजलगाव येथील टायगर ग्रुप च्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला आज माझ्या लाडक्या कन्येचा, समृद्धीचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे अत्यंत वेगळ्या आणि आनंददायी पद्धतीने साजरा केला. खऱ्या अर्थाने आनंद वाटल्याने द्विगुणित होतो, म्हणूनच आम्ही जिल्हा परिषद शाळा, चिंचगव्हाण येथील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंदच आमच्यासाठी समृद्धीचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. या उपक्रमात सहकार्य केल्याबद्दल सरपंच राजेभाऊ अर्जुन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मकसरे मॅडम, सौ. डोंगरे मॅडम आणि आनंत यादव सर्व शिक्षक वृंद यांचे मनापासून आभार मानले आजचा हा दिवस आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय राहिल. असे मनोगत व्यक्त करत सतीश फाटे (युवा उद्योजक) माजलगाव यांनी सर्वांचे आभार मानले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






