आष्टी बनले घाणीचे साम्राज्य गेल्या दोन महिन्यापासून बाप्पाया गल्ली मधील अंडरग्राउंड सांडपाणी पाईप लाईन चोकअप; ग्रामपंचायतीची टाळाटाळ;

ग्रामसेवकांकडे तक्रार करून हि होत नाही काम वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

आष्टी : आष्टी ग्रामपंचायत येथील बाप्पाया गल्ली येथे गेल्या दोन महिन्यापासून अंडरग्राउंड सांडपाण्याची पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः असह्य झाले आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावामुळे ३५ ते ४० कुटुंबांना विविध आजारांना समोरे जावा लागत आहे.याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसेवक यांना तक्रारी दिल्या. मात्र ग्रामपंचायत कडून अंडरग्राउंड सांडपाण्याची पाईपलाईन दुरुस्त करायचे सोडून जास्त खराब करण्यात आले ८ दिवसापूर्वी पाईपलाईन काडून रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली यामुळे खड्या मध्ये घाण पाणी साचून परिसरात दुर्घंधी पसरली आहे यामुळे नागरिकांना येजा करण्यासाठी तारेवरची कसरत करावा लागत आहे ग्रामसेवकांना व ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना कॉल केले की केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.पावसाळा तोंडावर आला असताना सांडपाणी व पावसाचे पाणी या खड्यात साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात लहान मुले व वय वृद्ध नागरिक राहत असून सतत आजारपणाचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.साचलेल्या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला असून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांना या घाणीच्या साम्राज्यातून तात्काळ मुक्त करावे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल