आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल उमेश काष्टे यांचा सत्कार…

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर प्रतिनिधी : परतूर लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर येथील बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी उमेश काष्टे यांची भारतीय सैन्य दलात (आर्मी) निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे तसेच प्राध्यापिका डॉ. रेणुका भावसार यांनी उमेश काष्टे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनीही उमेशच्या यशाचे कौतुक करून त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उमेश काष्टे यांना घडविण्यासाठी व त्यांच्या यशामागे प्रा. आर. एस. गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन व अथक परिश्रम लाभले असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या सत्कार समारंभास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश काष्टे यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल