स्वराज्य वार्ता चिखली : बबनराव आराख
जळगाव : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन,मुक्ताईनगर जिल्हा जळगावच्या स्वर्गीय शाहीर मनोहरराव पवार यांच्या केवळद येथील निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर आपल्या मनोगतात शाहीर यांच्या आठवणी सांगताना गहिवरून म्हणाले की, शाहीर यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते त्यांची फाउंडेशनच्या विविध संमेलनात, वर्धापन दिनाला आणि दर शनिवारला असणाऱ्या झूम मीटिंगला उपस्थिती असायची फाउंडेशनच्या कार्याविषयी शाहिरांनी सुंदर पोवाडा रचलेला होता प्रत्येक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र गीता नंतर शाहीर हा पोवाडा गायचे तेव्हा उपस्थितांच्या अंगावरती शहारे यायचे असा त्यांचा सुंदर शाहिरी आवाज होता. वेळोवेळी फोनवर त्यांचा संपर्क असायचा महाराष्ट्रातील शाहिरी व साहित्यिक परंपरेची मोठी हानी झालेली आहे. शाहीर यांनी उज्जैनकर फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून सक्षम कार्य केले होते त्यानंतर त्यांना 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली होती याप्रसंगी त्यांनी शाहिरांना राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये राष्ट्रीय संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनच्या एक हात मदतीचा या आवाहानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र सह गुजरात येथील फाउंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्त दिलेल्या प्रतिसादातून 43 हजार रुपयांची आर्थिक मदत केली तो चेक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर व उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय शाहीर मनोहरराव पवार यांच्या सौभाग्यवती सुनिता ताई, मातोश्री व दोघी कन्या यांना सुपूर्त केला.
या प्रसंगी फाउंडेशनचे राष्ट्रीय संघटक धाराशिव येथील ज्येष्ठ कवी डॉ. मधुकर हुजरे फाउंडेशनचे राष्ट्रीय संघटक हिवरा आश्रम येथील प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके, फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर येथील प्रा.डॉ.सुभाष बागल
फाउंडेशनचे राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील अँड सर्जेराव साळवे
आदींनी स्वर्गीय मनोहरराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या प्रसंगी फाउंडेशनचे कार्यकारिणीचे सदस्य श्री सुनिल भाऊ मुंधोकार बुलढाणा जिल्हा समन्वयक खामगाव येथील श्री बाळू भाऊ इटणारे राष्ट्रीय संघटक धाराशिव येथील डॉ.मधुकर हुजरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष खामगाव येथील श्री शंकरराव अनासुने राष्ट्रीय संघटक हिवरा आश्रम येथील प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर येथील प्रा.डॉ. सुभाष बागल राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील अँड सर्जेराव साळवे विदर्भ विभागीय सचिव मलकापूर येथील प्रा.डॉ.रमेश परिहार बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष श्री मनोहरराव काळे मलकापूर येथील श्री गोपाळ भंगाळे डॉ.सुनील पवार ज्येष्ठ साहित्यिक बुलढाणा येथील श्री सर्जेराव चव्हाण आदि पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







