स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : परतुर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता घनसावध यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संस्थेच्या वतीने दरवर्षी पुरस्काराचे वितरण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना करण्यात येते यावर्षीचा हा पुरस्कार परतुर येथील सामाजिक कार्यकर्त्या मानवाधिकार जालना जिल्हा संघटन अध्यक्ष तथा भीमा कोरेगाव बचाव समितीच्या जिल्हाध्यक्ष ललिता माधव घनसावध यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या प्रशस्ती पत्रात म्हटले आहे की, आपण सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये अमूल्य असे योगदान दिले आहे या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या संस्थे कडून हा मान सन्मानाचा पुरस्कार आपणास देत आहोत यापुढेही आपणाकडून असेच कार्य घडत राहो. असे संस्थापक संचालक भैय्यासाहेब पाईकराव यांच्या स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी पु. भंते के. आर. लामा, पु. भंते रिंचेन पुन्ना, भिकू महामोगलयान, भिकू सदानंद, कैलासराव धनेश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कल्पनाताई किरतकर, रिपब्लिकन सेनेचे ठाणे शहराध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, स्वागतासाठी अध्यक्ष डॉक्टर श्याम दवणे, डॉक्टर सिद्धार्थ सोनकांबळे, सुनिता धनेश्वर भगवान गरड आदी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. फोटो. परतुर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता घनसावध यांना मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटीने समाज रत्न पुरस्काराने सन्मानित केली यावेळी पुरस्कार स्वीकारताना ललिता घनसावध सह अध्यक्ष भैय्यासाहेब पाईकराव, प्रदेशाध्यक्ष कल्पनाताई किरतकर आदी.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







