परतूर हादरले! १००% दिव्यांग व्यक्तीला हॉटेलमध्ये अमानवीय मारहाण; ‘प्रहार’चा पोलीस प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर प्रतिनिधी : परतूर शहरातील ‘मनपसंद हॉटेल’मध्ये एका १००% दिव्यांग (अपंग) व्यक्तीला किरकोळ कारणावरून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, ‘प्रहार क्रांती संघटना’ आणि दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोषींवर तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास ४८ तासांत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परतूर शहरातील मनपसंद हॉटेलमध्ये कॅबिनमध्ये बसण्यासारख्या अत्यंत शुल्लक कारणावरून श्री. अली हसन मोहम्मदी (वय वर्ष १००% दिव्यांग) यांना चौघांनी मिळून क्रूरपणे मारहाण केली. एका हतबल आणि स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या दिव्यांग व्यक्तीला अशा प्रकारे लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारणे, ही बाब माणुसकीला आणि लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे शहरातील समाजविघातक प्रवृत्तींचे धाडस किती वाढले आहे, हेच दिसून येते.

घटनेचा निषेध करण्यासाठी प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी साहेब आणि मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतूर यांना लेखी निवेदन देऊन कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तसेच निवेदनात आरोपींवर कलमांनुसार तात्काळ गुन्हे (FIR) दाखल करण्याची मागणी केली आहे:

भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ११५ (स्वैच्छिक दुखापत), कलम ३५१ (गुन्हेगारी धमकी), आणि कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान).

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ (RPWD Act): कलम ९२ (दिव्यांग व्यक्तीचा छळ किंवा अपमान करणे – हा गुन्हा अजामीनपात्र आहे). तसेच १. तात्काळ FIR व अटक: दोषींवर वरील सर्व कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.२. पोलीस संरक्षण: पीडित दिव्यांग व्यक्ती श्री. अली हसन मोहम्मदी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून तात्काळ सुरक्षा पुरवण्यात यावी.३. जलद तपास (Fast Track): या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत.

“एका १००% दिव्यांग बांधवाला अशी अमानवीय वागणूक देणे अत्यंत निंदनीय आहे. जर येत्या ४८ तासांच्या आत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर प्रहार क्रांती संघटना आणि जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाल्यास, त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील.”

— प्रहार क्रांती संघटना, जालना. रवींद्र अंभोरे

या घटनेमुळे परतूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता पोलीस प्रशासन या नराधमांवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवेदन देताना नवाब शेख, शेरखान जबर खान पठाण,दादाराव बकाल, फिरोज पठाण, ज्ञानेश्वर आढे, कुलदीप राठोड, अशोक तनपुरे, माजेद सय्यद, मोली कदम, नामदेव गोरे, शकील कुरेशी, सुभाष शिंदे, बजरंग वैष्णव, हनुमान माने, फिरोज शेख, आनंद लाळे, बबन लाईटबार अध्यक्ष व सदस्य प्रहार क्रांती संघटना शेख वाहद, शेख समीर, नोशद अन्सारी, केशव काळदाते, शेख नयुब, सर्व उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल