शाळा आणि स्मशानभूमीच्या परिसरातील दुकानामुळे नागरिकांना नाहक त्रास
स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे येथील बसस्थानक परिसरात, पंढरपूर ते शेवगाव राष्ट्रीय महामार्गावरील टीपू सुलतान चौकाजवळ सुरू असलेले ‘देशी दारूचे दुकान तात्काळ अन्यत्र ‘स्थलांतरित करावे, अशी मागणी वंचित बहजन आघाडीने केली आहे. हे दुकान न हटवल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आष्टी शहराध्यक्ष गणेश वैध यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या नवदनातून दला आह.
हे दुकान अत्यत वदळाच्या भागात असन, येथन अवघ्या २० फट अंतरावर पी. ए. इनामदार विद्यालय आहे. दररोज याच मार्गावरून जाणाऱ्या विद्याथ्यांच्या सुरक्षितेचा आणि सभोवतालच्या वातावरणाचा गंभीर प्रश्न यामळे निर्माण झाला “आहे.. तसेच, केवळ १०० फूट अंतरावर विविध समाजांच्या स्मशानभमी असून अंत्ययात्रा याच मार्गाने जातात. अशा वेळी दकानासमोर मद्यपान करणाऱ्यांची गर्दी आणि त्यांचा गोंधळ नागरिकांसाठी संतापजनक ‘ ठरत आहे. बसस्थानक, व्यापारी आस्थापना, राष्ट्रीय महामार्ग आणि शैक्षणिक संस्थांमुळे’हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो अशा ठिकाणी दारूचे दुकान सरू ठेवणे हे प्रशासनाचे गंभीर द्लक्ष असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मद्यपींच्या वारंवार होणाऱ्या वाद आणि गोंधळामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन द्कानाचे स्थलांतर करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारला जाईल, असे निवेदनात आहे. हे निवेदन स्पष्ट करण्यात आल देताना वंचितचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, जमीर भाई, राज् शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







