स्वराज्य वार्ता / आकाश पिसुळे
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी : प्रवेश सोहळा दि.९ एप्रिल २०२६ अरगडे गव्हाण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून सरपंच बबलू भैय्या गुजर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी सरपंच बबलू भैय्या गुजर यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सतीश गोरे, दिलीप गोरे, संपत कांबळे, बाबासाहेब गोरे, काशिनाथ पिसुळे, सचिन गुजर, जगन गुजर यांनीही हिकमत दादा उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.
स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र असून आगामी काळात याचा राजकीय परिणाम दिसून येणार आहे.
या प्रसंगी सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






