स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे ईद हा सण केवळ आनंदाचा नसून प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. आपल्या देशाची खरी ताकद विविधतेत दडलेल्या ऐक्यात आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध आदी सर्व समाज एकत्र येऊन सण साजरे करतात, तेव्हा सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी केले. आष्टी येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ईद मिलन सोहळा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी समाजातील एकोपा, परस्पर विश्वास आणि सौहार्द यांचे महत्त्व अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर प्रेम, विश्वास आणि एकात्मतेची भावना अधिक वृद्धिंगत होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांनी एकत्रितपणे काम केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. या प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, तुकाराम सोळंके, रवी सोळंके, सरपंच मधुकर मोरे, बाबाराव थोरात, बबलू सातपुते, विष्णूकाका शहाणे, बाळासाहेब लहाने, अमोल जोशी, छत्रपती थोरात, सुरेश जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उपसरपंच नसरुलाह खान काकड यांच्यासह आसिफ कच्छी, अल्ताफ कुरेशी, रफीक राज, सईद शेख, मुजीब भाई, नसीर अंसारी, रफीक कुरेशी, मोहम्मद जमिनदार, शाहनवाज कुरेशी, मुक्ततार कुरेशी, अहमद टेलर, इनायत खा काकड आदींनी केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






