आष्टी : जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून गुरुकुलाचे तब्बल सहा विद्यार्थी नवोदय पात्र ठरले आहेत. मागील पाचवर्षापासून गुरुकुल सातत्याने गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन मुलांची तयारी घेत असून आत्तापर्यंत गुरुकुलाचे 15 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. नवोदय परिक्षेसोबतच N.M.M.S. परिक्षेतही मुलांनी बाजी मारली असून 10 पैकी 9 मुले N.M.M.S. पात्र ठरली आहेत. त्याचबरोबर J.T.S., मंथन, शिष्यवृत्ती, सैनिकशाळा इ. सर्वच परिक्षेत गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्या सर्वांचं कौतूक परिसरात होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून इतरही मुलांना प्रेरणा देण्यासाठी या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवव्याख्याते स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेजचे प्रा. डॉ. पांडुरंगजी नवल सर यांची ऊपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रकाश ढवळे सर, श्री. कृष्णाशेठ टेकाळे ( अध्यक्ष – व्या. म. आष्टी ), श्री. कुंडलिकराव जाधव सर ( सि. मा. विद्यालय आष्टी ), श्री. सुरेश बहाडसर ( संचालक – सेवासाधना गुरुकुल रोहिणा ), श्री. धनराज मल्लाडे सर ( जि.प.प्रा. शाळा रायगव्हाण ), सौ. स्वातीताई तौर मॅडम ( संचालिका – राष्ट्रमाता इं. स्कुल आष्टी ) यांची ऊपस्थिती होती. तसेच सकाळचे जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा कलाशिक्षक श्री. मोहनराव सोळंके सर यांनी अध्यक्षिय स्थान भुषविले. कार्यक्रमासाठी विशेष ऊपस्थिती श्री. कैलास शेळके सर, श्री. शरद शिंदे सर, श्री. गोकुळ कदम सर, श्री. तानाजी कदम सर, सौ. खरात मॅडम तसेच सर्व पालकांची विशेष ऊपस्थिती होती.
प्रसंगी मान्यवरांनी ऊपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून सर्व गुणवंत मुलांसह पालक व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला. मार्गदर्शन करणारे श्री. रमेश पौळ सर, श्री. सचिन सवडे सर, श्री. एम. आर. शिंदे सर सौ. अंजली सोळंके मॅडम आणि गुरुकुलाचे संचालक श्री. पी.डी. सोळंके यांचाही यावेळी विशेष सत्कार पालकांच्यावतीने करण्यात आला. या यशाचे परिसरात कौतूक होत आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






