आष्टीत शिक्षण क्षेत्राला मोठी भरारी – इंदूबाई इंटरनॅशनल स्कूलला इयत्ता १ ते १२ वी पर्यंत मान्यत;

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे शिक्षण क्षेत्रासाठी आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दि. १६ मार्च २०२६ रोजी इंदूबाई इंटरनॅशनल स्कूल, आष्टी या शाळेला राज्य शासनाकडून इयत्ता पहिली ते बारावी (आर्ट, सायन्स व कॉमर्स) पर्यंत अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.

या मान्यतेमुळे आष्टी व परिसरातील विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. ग्रामीण भागातच आधुनिक व सर्वसमावेशक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शाळेला ही मान्यता मिळवून देण्यासाठी परतूर-मंठा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. बबनराव लोणीकर साहेब तसेच युवानेते मा. श्री. राहुल भैय्या लोणीकर यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच ही मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे.

याबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. तुकाराम आबा सोळंके यांनी आमदार लोणीकर साहेब व राहुल भैय्या लोणीकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या निर्णयामुळे आष्टी परिसरातील शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, भविष्यात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भक्कम पाया येथेच तयार होणार आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल