स्वराज्य वार्ता वैजापूर तालुका प्रतिनिधी श्री अनिल सूर्यवंशी
“सशक्त महिला -सशक्त समाज” “उद्यमी महिला -उद्यमी परिवार” यास्तव प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना सन-२०२५-
२०२६ प्रचार व प्रसिद्धी या घटका अंतर्गत महिला शेतकरी गट,व महिला स्वयंम सहायता गट
येथील निर्मला इन्स्टिट्यूट च्या प्रांगणात सोमवार(ता,१६)रोजी सम्पन्न झाली.महिला बचत गट याना विविध व्यवसाय व उद्योग या विषयी मार्गदर्शन,तसेच अनुदान कसे प्राप्त करावे? व स्वावलंबी कसे बनावे ? या विषयी सखोल माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील शासनच्या कृषी विभागाचे कृषी उपसंचालक दीपक गवळी,व वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार तालुका कृषी अधिकारी ठक्के सर यांनी तालुक्यातील एकत्र आलेल्या महिला बचत गटाच्या 350 महिलांना व पुरुषांना
स्वावलंबी बनण्यासाठी, व बचत गटामार्फत चालविण्यात येणारे उद्योग ,पिकांवर कीटक पडले असतांना घ्यावयाची खबरदारी व उपाय योजना “महाविस्तार एआय अप”उपस्थिताना डाऊन लोड करून दिला व काही समस्या असल्यास त्यांचे भ्रमण ध्वनी देऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले.निर्मला इन्स्टिट्यूट ने महिला दिन अंतर्गत महिलांनी व्यवसायाकडे वळावे व त्याचा अर्थिक सबलीकरण व्हावे हाच ध्यास घेतलेल्या संस्थेच्या संचालिका माग्रेट दिब्रिटो ह्यांनी महिला दिन आयोजित केला होती.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून
डॉ.प्रतिमा सोनवणे,संतोषी भालेराव यांची उपस्थिती होती.आरंभी विद्येची दैवत सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.प्रास्तविक इन्स्टिट्यूटच्या मार्गा रेट दिब्रेटो यांनी केले.तारीका इक्का यांनी सहकार्य केले.या प्रसंगी कृषी खात्याचे श्री थत्ते,गंगापूर तालुका कृषी अधिकारी जायभाए,श्री .गांगुर्डे,श्री शिनगारे,कृषी सहायक थोरात, धोंडीराम सिंग राजपूत,
अनिल बनकर,अक्षय बनकर, श्रीमती पंडित, शाम पाटील,व कृषी सहायक उपस्थित होते,सूत्र संचलन इरफान सय्यद यांनी केलेb तारीका इक्का यांनी आभार मानले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






