स्वराज्य वार्ता / राम राठोड
सर्व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे – संदीप पवार
जालना प्रतिनीधी : जालना जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद जालना अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि 2023 -2024 व 2024-2025 या दोन वर्षाचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण दि.17 मार्च 2026 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मुक्तेश्वर लॉन्स जालना येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम.यांच्या संकल्पनेतून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू पी.एम.या राहणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, प्रकल्प संचालक सुनील पठारे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुधीर चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजेंद्र तुबाकले तसेच सर्व विभाग प्रमुख,सर्व गटविकास अधिकारी, सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच जिल्हा परिषद जालना अंतर्गत सन 2023-2024 या वर्षातील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शारदा दादाराव साबळे जालना, विलास भीमराव गायकवाड बदनापूर, जनार्दन जिजाऊ भोसे अंबड, रणजीत चिमाजी पटेकर घनसांवगी, श्रीमती गंगासागर बलभीम गायकवाड परतुर, नरेंद्र बाबुलाल पवार मंठा, रघुनाथ सुखदेव सोनुने भोकरदन, श्रीमती कल्पना गजेंद्र सुलताने जाफराबाद, सन 2024 – 2025 या वर्षातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत अधिकारी
गजानन विष्णू सातपुते जालना, अंकुश कौतिकराव हिरेकर बदनापूर, श्रीमती गीतांजली राधाकृष्ण वल्ले अंबड, किशोर भागवत वखरे घनसावंगी, प्रशांत श्रीराम लाळे परतुर, शिवशंकर राधाकृष्ण विधाते मंठा, येडूबा राजाराम वाघ भोकरदन, राजेश विठ्ठल परिहार जाफराबाद आणि 2024 – 2025 वर्षातील महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रवीण बाबुराव पवार यांचा परीवारासह सन्मान करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार, ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या राज्य उपाध्यक्ष दुर्गा भालके, मानद अध्यक्ष प्रवीण पवार, जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे, जिल्हा सरचिटणीस व्ही.ए.भगत, कोषाध्यक्ष ए.आर.काकडे, कार्याध्यक्ष एम.एम.मिसाळ यांच्यासह सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी तालुकाध्यक्ष, सचिव यांनी केले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






