स्वराज्य वार्ता / श्री अनिल सुर्यवंशी
वैजापूर तालुका प्रतिनिधी : वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील शंकर स्वामी महाराज मंगल कार्यालय या ठिकाणी महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले.
या शिबिरामध्ये सातबारा दुरुस्ती, फेरफार नक्कल,इंदिरा आवास योजना,संजय गांधी निराधार योजना,विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र वाटप,रेशन कार्ड दुरुस्ती,आधार कार्ड वरील नावाची दुरुस्ती,विवाह नोंदणी, जन्म मृत्यू नोंदणी,घरासाठी पट्टे वाटप ई मोजणी अर्ज,श्रावण बाळ यासारख्या योजनाचे 840 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री संजय निकम, नायब तहसीलदार महाजन साहेब, नायब तहसीलदार कुमावत साहेब, ए.पी.आय. रणखांब साहेब,महसूल मंडळ अधिकारी कुसनुरे साहेब, कृषी मंडळ अधिकारी शाम पाटील साहेब, आरोग्य कर्मचारी नायला हसमे,तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग, महसूल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी , आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी,ग्राम पंचायत अधिकारी , सहाय्यक कृषी अधिकारी, महसूल सेवक,पोलिस पाटील अंगणवाडी सेविका,महिला बचत गट प्रतिनिधी ,
शिऊर व परिसरातील सर्व राजकीय आजी-माजी कार्यकर्ते, शेतकरी वर्ग, तरूण वर्ग, डिजिटल मीडियाचे व न्युज पेपर चे सर्व पत्रकार बंधू या शिबिरास हजर होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






