वैजापूर येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेची पूर्वनियोजन बैठक संपन्न;

स्वराज्य वार्ता / श्री अनिल सूर्यवंशी

वैजापूर तालुका प्रतिनिधी : आज वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात आमदार प्रा रमेश बोरनारे सर यांच्या अध्यक्षतेखाली “मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते” योजनेविषयी पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीदरम्यान शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या या योजनेअंतर्गत शेतापर्यंत सुलभ व सुरक्षित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीमाल वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते निर्माण करणे, तसेच पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी कमी करणे या अनुषंगाने विस्तृत चर्चा आमदार साहेबांनी केली.

तसेच मातोश्री पानंद रस्त्यांचे जुने प्रलंबित प्रस्ताव, मंजूर कामांची सध्याचीस्थिती, तांत्रिक मान्यता, निधी उपलब्धता, तसेच कामांची गुणवत्ता यांचा सखोल आढावा घेण्यात आला. शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन बाजारपेठेशी थेट संपर्क सुलभ होईल आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.

वैजापूर तालुक्यातील प्रत्येक पात्र गाव व वस्तीपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना आमदार_साहेबांनी देत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या बैठकीत ऑनलाइन व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी श्री.दिलीपजी स्वामी साहेब यांनी देखील संबंधित विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्री.अरुण जऱ्हाड साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.भागवत फुंदे साहेब, तहसीलदार श्री.सुनील सावंत साहेब, गटविकास अधिकारी वाकचौरे साहेब, मुख्याधिकारी श्री.भागवत बिघोत साहेब, माजी सभापती श्री.भागिनाथ दादा मगर, जिल्हा परिषद सदस्य श्री.रामहरी बापू जाधव, श्री संजय निकम, श्री.श्रीराम गायकवाड, श्री.दीपकभाऊ राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख श्री.राजेंद्र साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.गोरख आहेर, श्री.संभाजी जगताप, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री.अजित रोडगे साहेब, जि.प. उपकार्यकारी अभियंता श्री.सातपुते साहेब, पोलीस निरीक्षक श्री.सत्यजित ताईतवाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.वाघमोडे साहेब, श्री वैभव रणखांब साहेब व संबंधित सर्व विभागीय अधिकारी व तलाठी ग्रामसेवक, सरपंच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल