स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी: परतूर तालुक्यातील आष्टी येथे दिनांक 6 मार्च रोजी व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक श्रीरंग बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सहावी मधील सुमारे 175 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पना वर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रण, सौर ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा स्त्रोत, रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन. तसेच विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पाची माहिती उपस्थिती पाहुण्यांना दिली यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर गंगथरे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आणि विज्ञानाची कास धरून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनोज साखरे, बिराजदार सर श्री आर के खंडागळे सर केंद्रप्रमुख श्री राम सोळंके इत्यादी उपस्थित होते.

प्रदर्शनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन कास्तोडे विज्ञान शिक्षक शेख साजिद, धारूरकर सर, श्री राम सर,सुजाता गंगाधरे मॅडम तसेच गायकवाड सर, परमेश्वर सर साक्षी सातपुते, सपना गिराम, प्रतीक्षा कुरधने निंबाळकर मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घाटूळ सर यांनी केले व प्रदर्शनाच्या शेवटी उत्कृष्ट प्रकल्पांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






