स्वराज्य वार्ता वैजापूर तालुका प्रतिनिधी श्री अनिल सूर्यवंशी
महिलेची छेडछाड करणाऱ्या सरपंचावर कारवाईची मागणी; पोलीस निरीक्षकांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हटविण्याचा प्रयत्न करून एका महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा भोकरदन येथील शिवप्रेमींच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे. गावातील सरपंच गणेश काकड हा महाराजांचे
स्मारक काढण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. मात्र, त्याला संजीवनी वाघ यांनी विरोध केला असता सरपंचाने व त्याच्यासोबत असलेल्या इतर लोकांनी महिलेच्या अंगावरील कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप
निवेदनात करण्यात आला आहे. शिवरायांचे स्मारक काढण्यासाठी या सरपंचाने पुढाकार घेतल्याने सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होऊ शकते, त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर विकास जाधव, राहुल देशमुख, भूषण जाधव, आप्पासाहेब जाधव, नारायण लोखंडे, दिनेश पडोळ, सुरज मव्हारे, अंगद सहाणे, जनार्दन तळेकर, सचिन ढोके, अनुराग बोराडे, पवन जाधव, ईश्वर इंगळे, रणजित जाधव, एकनाथ इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या केल्या.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






