स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आनंदगाव ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने विकासकामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते चंद्रमोहन मोरे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश परतूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे लेखी आश्वासन मोरे यांना दिले. हे आश्वासन मिळाल्यानंतर मोरे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केल्याचे सांगितले. मोरे यांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीतील गैरकारभाराच्या चौकशीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी थेट जिल्हा परिषद जालना कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी उपोषण थांबवले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






