लालबहादूर शास्त्री विद्यालय इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ;

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

प्रतिनिधी आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. दिनांक 2/2/, सन 2025 व2026(सोमवार) रोजी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

 

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य आर बी नवल सर यांच्या हस्ते स्वर्गवासी बाबासाहेब आकात व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मंचावर प्राचार्य अरबी नवल सर, उपमुख्याध्यापक के.बी. जगताप सर, प्रवेशक धोंडगे सर, ज्येष्ठ शिक्षक कामठे सर, होडाडे सर, कैलास शेळके, योगीराज सोळंके, राहुल सवादे, दीपक वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य नवलसर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक व जीवनातील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. वर्गशिक्षक राहुल खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पाच व्हाईट बोर्ड खरेदीसाठीची रक्कम प्राचार्यांकडे सप्रेम भेट म्हणून सुपूर्द केली.

तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एकूण आठ हजार रुपयांची सामूहिक भेट शाळेस देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरे, डी.एम. जाधव, एस.एस. काळे, आर.जी. वावळ, एस.एम. खंडाळे, आर.के. रूपनकर, एस.एस. आर्यन सरनाईक, एम.आर. चौरे, ए. सुनील मगर, मुंडे, डी.एम. राठोड, आर.पी. विशाल भदर्गे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन निरोप समारंभाची सांगता करण्यात आली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल