शास्त्री विद्यालये स्नेहसंमेलन उत्साहात;

स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी : ता.28:-परतूर तालुक्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले.या वेळी उद्घाटन कपिल आकात यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेश नवल हे होते. या वेळी प्रमुख व्याख्याता म्हणून संभाजीनगर येथील रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक धनंजय आकात हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे,पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे,सरपंच मधूकर मोरे,ओंकार काटे,सत्तार कुरेशी, सिध्देश्वर सोळंके, प्रविण चौरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात ‘शाळा सुंदर सुंदर’ या बहारदार गीताने झाली . प्रश्न मंजुषा,गीतगायन,फॅन्सी ड्रेस,रांगोळी आदी स्पर्धेत चुरस निर्माण झाली. लेझिम नृत्य,दांडिया नृत्य लक्षवेधक वेधक ठरले. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी नृत्य स्पर्धा,समूह नृत्य,नाट्य छटा आदी स्पर्धेत रंगत आली.

या मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘लहरी दो’ देशभक्तीपर समुह व ‘हुंडा नको मामा’नृत्यास प्रेक्षकांनी दाद दिली .विशेष म्हणजे “ गोंधळ या थरार समूह नृत्याने वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाची सांगता दांडिया व लेझीम पथकाने लक्षवेधक झाली. या सांस्कृतिक कार्यक्रमास शाळेचे प्रागणं पालक प्रेक्षकांनी भरून गेले होते दर वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात वेगळेपण जपणारी शाळा म्हणून आष्टी सह परिसरात लाल बहादूर शाळेची ओळख कायम ठेवली आहे . सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी तर माधव सरनाईक यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमास उप मुख्याध्यापक के.बी. जगताप,पर्यवेक्षक वसंत धोंडगे,अप्पूशेट सोळंके, अशोक काटे, व्यापारी महासंघाचे शेख हबीब,राजेश राठोड यांच्या सह प्राध्यापक,शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कलाध्यापक मोहन सोळंके,वसंत गायकवाड,प्रा.खरात, अमोल कदम,सुनिल मगर,राहुल खंडागळे,बद्री कदम,राहूल सवादे यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल