स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दिनांक 15 जानेवारी रोजी आष्टी येथील पोलीस स्टेशनचे एपीआय सुरवसे साहेब यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शंकर गंगधरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेतील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन व मशाल पेटवून करण्यात आले. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायती व पथसंंचालन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. याप्रसंगी बोलताना डॉक्टर शंकर गंगधरे यांनी असे सांगितले की, या क्रीडा महोत्सवमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला असून क्रीडा संस्कृतीला अजून प्रोत्साहन मिळेल.
या महोत्सवमधून आणि खेळाडूंची जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेत निवड केली जाते अशी माहिती शाळेचे प्रिन्सिपल गजानन कास्तोडे यांनी दिली.
याप्रसंगी आष्टीतील प्रतिष्ठित व्यापारी श्री राजेश पळसे,अरुण भाऊ डोईजडकर, भागवत जगताप, हबीब शेख तसेच डॉ.वाघमारे, डॉ.उंमरे, श्री वरकडे साहेब, श्री कोल्हे इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घाटुळ सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्री राम सर, संदीप राठोड सर,धारूरकर सर, परमेश्वर सर, साजिद सर, गायकवाड सर, अजय सर श्रीमती सुजाता गंगथरे, सपना गिराम, प्रतीक्षा कुरधने साक्षी सातपुते, निंबाळकर मॅडम आदींनी परिश्रम घेतले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






