अनुभव विश्व कथन करणारा कथासंग्रह वडाचं झाड 

मानवी मन हे कथेमध्ये रमत. सुखदुःखाची कथा बनते. या कथेतून आपले वास्तववादी अनुभव मांडून विचार प्रक्रिया जलद करू शकतो.असाच काहीसा प्रत्यय ज्योती वामन बन्सोड यांच्या कथासंग्रह वडाचं झाड वाचतांना आला.

या कथासंग्रहामध्ये 19 कथा समाविष्ट असून त्यातील पहिलीच कथा ‘वडाचं झाड’ आहे.

या कथेच्या नावावरूनच या संग्रहाला ‘वडाचं झाड ‘ हे नाव दिल्या गेले. हे सदर कविता वाचता लक्षात येते.मरणानंतर सुद्धा आपण वृक्षारोपणाने जिवंत राहू शकतो. हे वास्तववादी चित्रण या कथेमध्ये आलेलं आहे.

याचबरोबर सुरज ही कथा एका अंध गायकाची कलात्मकता सादर करते. सुरज हा जन्मता अंध असतो खूप उपचार केल्यावरही त्याला दृष्टी लाभत नाही. मात्र त्याची प्रगती गायक म्हणून होते. त्याच्या अंधत्वाचा कुठलाही परिणाम त्याच्या गायन व्यक्तिमत्त्वावर होत नाही ही प्रेरणादायी असलेली कथा मनाचा ठाव घेते.

जिलेबी ही कथा जेवणावळीतील जिलेबी हा गोड पदार्थ ची वाट पाहणाऱ्या झिंगा बुढी वर आधारित आहे. जेवणाच्या पंगतीत बसणारे ज्याला नको आहे ; त्याला आग्रहाने गोड पदार्थ वाढतात आणि ज्याची खायची इच्छा आहे; त्याला ते देत नाहीत. शेवटी आपली ही अतृप्त इच्छा घेऊनच झिंगाआजी जगातून निघून जाते आणि तिचे मन जिलेबीतच राहून जाते. असे चित्रण यात आहे. नको त्याला भरपूर आणि ज्याला हवे आहे त्याला काही नाही. याचाच प्रत्यय या कथेमध्ये येतो

स्वच्छंदी पक्षाचे विश्व यामध्ये आपल्या जन्मभूमीचे नैसर्गिक रक्षण करण्याचा संदेश दिला गेला आहेत. एका रोपट्याचे वृक्ष केल्याने आपण मातृभूमीचे पांग फेडू शकतो. असाच संदेश देत संत तुकारामाच्या ”वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती. ” याची प्रचिती आणून देण्याशिवाय राहत नाही.

समाजसेवी बकुबाई ही कथा नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड येथील पूरस्थिती वरील अनुभव कथन करणारी व्यक्ती रेखा; कथन करणारी कथा आहे. असे वास्तवदर्शन यामध्ये वाचायला मिळते. आपल्या हातून चांगले केल्यावर आपल्याला जे समाधान मिळते ते खरोखरच अलौकिक असते.

‘वडाचं झाड ‘ हा कथासंग्रह संवेदना प्रकाशन खापरखेडा नागपूर यांनी प्रकाशित केला असून यामध्ये एकूण

88 पृष्ठ समाविष्ट आहेत. या कथासंग्रहाला आचार्य विजया मारोतकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे वाचकांनी या संग्रहाचे वाचन करावे असा अनुभव विश्व कथन करणारा हा कथासंग्रह प्रत्येक वाचकांनी आपल्या संग्रही ठेवावा असाच आहे.

कथासंग्रह ‘ वडाचं झाड ‘

लेखिका सौ. ज्योती वामन बन्सोड (ग्रामगीताचार्य )बेलोना.

प्रकाशक संवेदना प्रकाशन नागपूर

पृष्ठे. 88

किंमत 125 रुपये

डॉ. अ.भा ठाकुर 

मुक्काम पोस्ट जवळा ता. आर्णी जिल्हा यवतमाळ मो.9975379166

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल