स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी
परभणी : मानवत येथील के. के. एम. महाविद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन 13/01/26 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार हे मान्यवर असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बालकिशन चांडक, प्रमुख पाहुणे, वक्ते,म्हणून सुप्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजीत भालेराव, परभणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. जी. पी. अंबेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. स्नेहसंमेलनात नृत्य, समूहगीत, नाट्यछटा, एकपात्री अभिनय तसेच शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम उपयुक्त असून विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आलेले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






