स्वराज्य वार्ता / राम राठोड
जिल्हाध्याक्ष्याची दुटप्पी भूमिका माजी सरपंच -भागवत कडपे
आष्टी :- परतूर तालुक्यातील आष्टी येथे व्यापारी महासंघाच्या नुतन कार्यकारणी साठी बुधवार दि. 7 रोजी जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी व्यापाऱ्यात एकमत न झाल्याने बैठक बारगळली. या वेळी जिल्हा अध्यक्ष सह पदाधिकार्याने काढता पाय घेतला.
आष्टी येथे नुतन व्यापारी महासंघाच्या कार्यकारणी गठीत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब डिजिटल एप चे मकरंद शहापूरकर अॕडव्हकेट श्री अय्यर महिला आघाडीच्या सौ. आनंदी अय्यर आदींची उपस्थितीती होती. प्रथम जिल्हाध्यक्ष श्री बंब यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्ष श्री कृष्ण टेकाळे सह त्यांच्या कार्यकारणीचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांचा कार्यकाल चांगला होता ते व त्यांच्या कार्यकारीणीने चांगले काम केले त्यांना पुन्हा संधी द्या असा आग्रह धरला या वेळी नवीनला संधी द्यायची का नाही हा गोंधळ निर्माण झाला. काही व्यापाऱ्यांनी त्यांना पुन्हा संधी द्यावी असे मत. व्यक्त केले तर याच वेळी अध्यक्षपदासाठी आष्टीचे माजी सरपंच तथा व्यापारी भागवत कडपे यांनी आपण अध्यक्ष पदासाठी ईच्छुक असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा अध्यक्ष यांनी कार्यकारी अध्यक्ष होण्याचा सल्ला भागवत कडपे यांना देत तुमचे काम पाहून पुढील निर्णय घेऊ तुमचे काम चांगले असल्यास आपण जिल्हा अध्यक्ष देखील होवू शकता असे म्हणाले यावेळी एकमत न झाल्याने. जिल्हा अध्यक्ष हस्तीमल बंब व कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी. काढता पाय घेतला. मात्र व्यापाऱ्यात गोंधळ उडाला मतदान घेऊन नुतन अध्यक्षासह कार्यकारिणी निवड करण्यात यावी अशी मागणी अनेक व्यापाऱ्यांनी केली.
दोन वर्षाची मुदत संपल्याने आज जिल्हा अध्यक्ष हस्तीमल बंब व जिल्हा कार्यकारिणी आष्टीत आली होती या वेळी मी अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगताच त्यांनी निवडणूक न घेता कार्यकारी अध्यक्ष होण्याचा सल्ला देत आपले काम पाहू चांगले असल्यास आपण जिल्हा अध्यक्ष होवू शकता असे म्हणत पहिली कार्यकारिणी पुढे कायम ठेवण्याचा पवित्रा घेतल्याने अनेक व्यापाऱ्यांना ही गोष्ट आवडली नाही त्या मुळे जिल्हा अध्याक्ष्यानी या वेळी कुठलाही तोडगा न काढत काढता पाय घेतला मात्र आम्ही अनेक व्यापारी आजच्या घटने मुळे समाधानी नाहीत लवकरच लोकशाही प्रमाणे निवड प्रक्रिया करत कार्यकारिणी निवडावी यात व्यापारी कुठलेही राजकारण व्यापारी करीत नसुन जिल्हा अध्यक्ष्याना नवीन अध्यक्ष नको असल्याने त्यांची बाजू घेत आज त्यांनी काढता पाय घेतल्याने त्यांची दुटप्पी भूमिका पहावयास मिळायचा आरोप केला व्यापारी तथा माजी सरपंच भागवत कडपे यांनी केला.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






