स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सुर्यराव
टिटवाळा: ठाणे जिल्हा हा आनेक राजे महाराजे, साधू-संत, महात्मा, देवी- देवता यांचे पद स्पर्शाने पावन झालेल्या भुमिवर आनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. भक्तिला शक्तीची साथ देणारा तसेच आंनद द्वीगुणित करणारा धार्मिक कार्यक्रम गोवेली या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हिंदू धर्म जागरण मोहोत्सवाचे आयोजन केले असुन या हिंदूधर्म जागरण मोहोत्सवाचे अध्यक्ष ह.भ.प श्री. माधव महाराज केशव हे आहेत. तसेच राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 16 डीसेंबर 2025 ते 23 डीसेंबर 2025 पर्यंत आठ दिवसाचे धार्मिक कार्य होणार असुन ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये सर्व पक्षिय नेते, विविध संस्था आणी संघटना जातपात विसरुन एकत्र येउन मोठ्या उत्साहात खेळी- मेळीने मोहोत्सवाचे काम करत आहेत. या मोहोत्सवाला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी गोवेली परिसरातील तसेच पंचक्रोशीतून महिलांचे व पुरूषांचे सहकार्य लाभले आहे. अशी माहिती शंभूदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य कार्यअध्यक्ष श्री. मोहन जयराम डोहळे यांनी दिली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






