आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे आज दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूल, कनकवाडी येथे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या वतीने गणित प्रदर्शन (Math-Exhibition) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष डॉ. शंकर गंगथरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास आष्टी येथील प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणितीय मॉडेल्स व प्रोजेक्ट्स पाहून मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले तसेच त्यांना मौल्यवान मार्गदर्शनही केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी असून नाविन्यपूर्ण असल्याचे मत आष्टी येथील प्राध्यापक श्री. गायकवाड सर यांनी व्यक्त केले. तसेच लाल बहादूर शास्त्री विद्यालय, आष्टी येथील प्राचार्य श्री. नवल सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत तसेच उज्ज्वल भवितव्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व पालकही आवर्जून उपस्थित होते. एकूणच हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण करणारा ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घाटूळ सर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य श्री. कास्तोडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन साजेद सर यांनी केले. या यशस्वी उपक्रमासाठी श्री. राठोड सर, श्री. राम सर, श्री. परमेश्वर सर, श्री. गायकवाड सर, श्री. धारूरकर सर, श्रीमती गंगथरे मॅडम, सातपुते मॅडम, निंबाळकर मॅडम, गिराम मॅडम व कुरधने मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







