स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे पाटील
कीर्तनातून समाजप्रबोधन
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री येथे माजी पोलीस पाटील तथा पोस्ट मास्तर स्वर्गीय गणेशराव शामराव पाटील वडजे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय सोहळ्यात ह.भ.प. नरहरीनाथ महाराज पळसेकर तालुका हदगाव यांची कीर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवा १८ डिसेंबर रोजी झालेल्या या कीर्तन सोहळ्यात महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीतून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले समाजप्रबोधनाचा वारसा जपत उंद्री येथील वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त व भजनी मंडळींनी मोठी गर्दी केली होती नामवंत कलावंतांची साथ या सोहळ्याला गायनाचार्य म्हणून लक्ष्मण गुरुजी सुगावकर खुशालराव पाटील लोणाळकर संतोष महाराज नागळारकर ह.भ.प. परमेश्वर महाराज औराळकर विश्वंभर महाराज माळगे आणि बालाजी महाराज औराळकर यांनी साथ दिली तसेच मृदंगाचार्य बळीराम महाराज देशमुख बाटापूरकर व वैभव महाराज नंदगावकर यांच्या वादनाने कीर्तनाची रंगत अधिकच वाढली याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन माधवराव पाटील वडजे उंद्रीकर ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव बोडके सर तसेच आम्ही वारकरी परिवार मराठा मावळा संघटना जिल्हाध्यक्ष नारायण गणेशराव पाटील वडजे वारकरी संप्रदाय तालुका अध्यक्ष मारोती गणेशराव पाटील वडजे आणि डाक विभाग बी.पी.एम. आकाश गणेशराव पाटील वडजे यांच्यासह वडजे कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्वीतेसाठी उंद्री येथील समस्त भजनी मंडळी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







