विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या मागण्या महाराष्ट्र राज्य पोलीस असो. संघटनेचे शिष्टमंडळ

 

स्वराज्य वार्ता / प्रतिनिधी राम राठोड

जालना : महाराष्ट्र राज्य पो. पाटील असो. संघटनेच्या वतीने शिष्ट मंडळा तर्फे निवेदन देण्यात आले आहे आपल्या अध्यक्षेते खाली व राज्यमंत्री तसेच त्यांचे सरकारी मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांना ६५०० रुपये वरून १५००० रुपये मानधन वाढवून दिल्याबद्दल प्रथम आपले मनःपूर्वक आभार.

त्याप्रमाणे नवीन होणाऱ्या पोलीस पाटील भरती मध्ये पदवीधर उच्चशिक्षित पोलीस पाटील नियुक्त झाल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी. त्यांचा शिक्षणाचा विचार करून त्यांना शासन सेवेत सामहून घेण्यात यावे. अनेक दिवसापासून पोलीस पाटलांच्या काही महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित असून त्याबाबत अधिवेशनामध्ये किंवा अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालय, मुंबई येथे आपल्या अध्यक्षतेखाली संबंधित खात्याचे अधिकार व पो.पा संघटनेचे पदाधिकारी समवेत बैठक लावून खालील मागण्या बाबत विचार विनिमय चर्चा होऊन निर्णय घेऊन राज्यातील पोलीस पाटलांना न्याय देण्यात यावा. अशी विनंती पो.पा असो. संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. महादेव नागरगोजे पाटील व असो. संघटनेचे सर्व पदाधिकारी व राज्यातील पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

पोलीस पाटील यांच्या महत्त्वाच्या मागण्या पुढील प्रमाणे
१) नवीन पदभरती मध्ये उच्च शिक्षण झालेले पोलीस पाटील नियुक्त झाल्यामुळे ४० हजार रुपये मानधन करण्यात यावे.
२) अंगणवाडी सेविका प्रमाणे मानधनावर काम करत असल्यामुळे पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० ऐवजी ६५ वर्षे करण्यात यावे.
३) नवनियुक्त पोलीस पाटील उच्च शिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांना शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी
४) पोलीस पाटलांना सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांना रिटायरमेंट (पेन्शन) १०,००० हजार देण्यात यावी अन्यथा एक रकमी २० लाख रुपये देण्यात यावे.
५) पोलीस पाटील भरती मध्ये सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचे पाल्यांना (वारस) सर्व निकष पूर्ण करीत असतील तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
६) पोलीस पाटलांना शासन कर्मचाऱ्याप्रमाणे पोलीस पाटील कार्यरत असताना मृत्यू किंवा अपघाती निधन झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंम्पा कायदा लागू करण्यात यावा असे निवेदनात म्हंटले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल