स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
देवगावफाटा : सेलू येथील चिरायु रूग्णालयात दृष्टी लायन्स क्लबतर्फे आयोजित शिबिरात ११० रूग्णांची रविवारी तारीख (७) मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी परतूर येथील दृष्टी लायन्स क्लबकडून रूग्णांची मोफत सेलू येथे नेत्र तपासणी करण्यात येते. त्यानंतर मोतिबिंदू असलेल्या रूग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी परतुर येथील रूग्णालयात पाठवले जाते. या मोहिमेत डॉ. रामेश्वर वानखेडे, कुंडलिक पावडे, किरण गायकवाड, योगेश केंधळे, भरत पौळ यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. शेख फरीद, नीता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे, गायत्री साळवे यांनी सहकार्य केले. या मोहीमेसाठी तालुका सचिव डॉ. बाळासाहेब जाधव, सेलू येथील लायन्स क्लब तालुका अध्यक्ष सयुष पटवारी उपाध्यक्ष अजित सराफ, डॉ शैलेश मालाणी, डॉ उमेश गायकवाड, डॉ अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ, डॉ परेश बिनायके, डॉ कुंदन राऊत, दत्तात्रय (उर्फ अप्पू शेठ) सोळंके, डॉ कैलाश आवटे, डॉ आशिष मेहता, दत्तात्रय सोळंके, डॉ सुदर्शन मालाणी, अनुप गुप्ता, कृष्णा काटे, जयसिंग शेळके, सुभाष मोहकरे आदींनी परिश्रम घेतले
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






