स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
मुखेड, ता. ६ डिसेंबर: मुखेड तालुक्यातील जाहूर येथे श्री. ह.भ.प. ब्रह्मानंद विठ्ठलराव बोडके यांच्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश सोहळा आज, शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ‘संत कृपा झाली, इमारत फळा आली’ हे ब्रीदवाक्य घेऊन बोडके कुटुंबाने पांडुरंग, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सद्गुरू जोग महाराज आणि आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे हा संकल्प पूर्णत्वास नेला.
सकाळी १० ते १२ या वेळेत होम-हवन व पूजा विधी पार पडले. यानंतर उपस्थित भाविकांसाठी विशेष भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री ह.भ.प. भागवताचार्य योगेश महाराज अग्रवाल यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांना साथ देण्यासाठी ह.भ.प. वसंत महाराज बेळीकर, विष्णू महाराज तांदळीकर, ज्ञानेश्वर महाराज भाटापुरकर, ऋषिकेश महाराज बेळीकर, मारोती महाराज उंद्रीकर, परसराम महाराज भाटापूरकर, बळीराम भाटापूरकर यांसह ह.भ.प. गोविंद महाराज, संतोष महाराज, ज्ञानेश्वर महाराज लिगापूरकर, योगेश महाराज गोजेगाव, सुद्धा महाराज माकणीकर आणि घोडके गुरुजी यांची उपस्थिती लाभली.
समस्त सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली होती. कीर्तन आणि भजनानंतर महाप्रसादाचा (भोजन) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मंगलमय कार्यक्रमात जाहूर आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून बोडके कुटुंबाला शुभ आशीर्वाद दिले.
यावेळी, श्री. ह.भ.प. ब्रह्मानंद विठ्ठलराव बोडके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






