स्वराज्य वार्ता / राम राठोड
परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव तांडा येथील राजेभाऊ श्रीराम चव्हाण रात्रंदिवस एवढ्या मोठ्या मेहनतीने केलेला केळीचा बाग रात्रीच्या वेळेस पाच सहा अज्ञातांनी फोरविलर आणून राजेभाऊ श्रीराम चव्हाण यांच्या शेतामध्ये तोंडाला आलेले केळीचे दोन एकर केळीचे झाड बुडापासून तोडले आहे ही घटना आज रात्री घडली आहे आणि पूर्ण ठिबक व पाईप सर्वकाही कोयत्याने तोडण्याचे चित्र समोर दिसत आहे एकीकडे बघितलं तर ओला दुष्काळ शेतकरी वर पडलेला आहे व शेतकरी होरपळून गेलेला आहे दुसरीकडे शेतीमालाला भाव नाही असे जर शेतकऱ्यावर संकटे पडले तर शेतकरी आत्महत्या करणार नाही का असा सवाल शेतकरी जनतेतून निर्माण होत असताना दिसून येत आहे ताबडतोब तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी पोलीस तहसीलदार स्पॉट पंचनामा करून घ्यावे व या पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा व नुकसान भरपाई द्यावी असे कोकाटे हादगाव येथील नागरिकाकडून होत आहे केळीचे झाडे तोडणाऱ्यांना या नराधमाला देखील ताबडतोब शोध घेऊन कठोर शिक्षा देण्यात यावी असे कोकाटे हादगाव येथील शेतकऱ्याकडून घोषणाबाजी होत असताना दिसत आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






