आष्टी येथे टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी सहित औषधांचे वाटप;


स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि.२१ शुक्रवार रोजी आष्टी येथील हजरत टिपू सुलतान चौक येथे हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी सर्वप्रथम हजरत टिपू सुलतान यांच्या प्रथमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संत गजानन हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आष्टी येथे मोफत आरोग्य तपासणी हि करण्यात आली व तसेच रुग्णांना औषधंचे वाटप हि करण्यात आले .यावेळी जिल्हाध्यक्ष ग्रामीण मुस्लिम वेलफेअर असोशियन चे हाजी रहेमतखान युसुफखान पठाण यांनी आयोजित केलेल्या मर्कजचौक येथील आरोग्य तपासणी शिबिरात ७०० रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आयोजक हाजी रहेमत खान यांनी दिली.हृदयाशी संबंधित, सर्दी, खोकला, ताप, सहित इतर तपासण्या करण्यात आले असून औषधांचे ही वाटप करण्यात आले.

जालना येथील तज्ञ डॉक्टरनी अनेक आजारावर सखोल मार्गदर्शन करत उपचार संबंधी सल्ला शिबारा दरम्यान रुग्णांना दिला.या शिबिराचे उद्घाटन अश्रोबा अण्णा कडपे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थित आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, कारी शमशोदीन, सरपंच मधुकर मोरे, उपसरपंच नसरुल्ला खान हे होते तर जालना येथील गजानन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ, डॉ रोहित कसाट, मधुमेह तज्ञ डॉ कुलभूषण मराठे, कर्क रोग तज्ञ डॉ. अविनाश सुरुशे, अस्थिरोग तज्ञ डॉ. विकास कतारे यांच्या सहित त्यांच्या सहकाऱ्यांन मार्फत रुग्णसेवा प्रदान करण्यात आली असून, शिबिरास यशस्वी करण्यासाठी मुफ्ती आलीम सहाब, मौलाना ईरफान सहाब, राजु कुरैशी, आजीम कुरैशी वसीम पटेल, गौतम शेळके, मुर्तुजा कल्याणकर, ग्रा.प.सदस्य अझर शेख, आसद खान काकड, डॉ.आर. के., आरबाज खान काकड सोहेल खान काकड, भगवानराव कांबळे,सिद्धेश्वर सोळंके,गणेश वैद्य,अतिक शेख,पवन आव्हाड, फारुख भाई कुरैशी, मोबीन मास्टर, ईरफान कुरैशी, सुलतान खान पठान साबेर मनियार, मोसीन जमीनदार, समीऊल्हखान काकड, शिवलीग आप्पा सहित इतरांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल