आष्टीतील ग्रामदैवत श्री खंडेश्वर मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली

स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य 

आष्टी : परतुर तालुक्यातील आष्टी येथील श्री ग्रामदैवत खंडेश्वर मंदिरातील दानपेटी व सीसीटीव्ही कॅमेरा चा डिव्हीआर चोरट्यांनी चोरी करून सीसीटीव्हीची नुकसान करून ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना (दि.२०) गुरुवारी पहाटे उघडकीस आली.याविषयी अधिक माहिती अशी की, १९ नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मंदिराचा दरवाजा लोटून पुजारी घरी गेले मात्र सकाळी ६ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी मंदिरात आल्यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजा उघडलेला दिसला. आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरासाठी लावलेली स्क्रीन पडलेली दिसली व डीव्हीआर दिसला नाही. दान पेटी फोडलेली दिसली. दानपेटीतील रक्कमही गायब झाली होती यात अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड व सोबतच सीसीटीव्हीची तोडफोड करून २० हजार रूपये किंमतीचा डीव्हीआर लांपास करण्यात आला. दोन्ही मिळून एकूण ५० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेनंतर या प्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक गोविंद थोरात यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी गणेश सुरवसे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ कांदे हे करीत आहेत. या प्रकारणामुळे आष्टी पंचक्रोशीतील भाविकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल